रणरणत्या उन्हाच, कधी पावसाच तुंबलेल्या पाण्यात काम कधी केल नाही ... भुकेल्या पोटी , बिन चहाच काम कधी जमलच नाही.. तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही. रोजच्या प्रवासात कार तर कधी ५० हजाराची बाईक, रस्त्यांनी हातगाडी आणि सायकली सुद्धा पाहिल्या नाहीत .. त्यांच्या पेक्षा सुखी म्हणून स्वतःचा मान सुद्धा मी ठेवला नाही. तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही. पाच आकडी पगार आणि बँकेत पाच-पाच अकाउंट पण पाच रुपयाचा साधा वडापाव भुकेल्याला दिला नाही. ए.सी.मध्ये बसून हॉलिडे प्लानिंग खूप केले, पण ऐन थंडीत काच उघडून कधी धुक्याला साधा स्पर्श सुद्धा केला नाही. तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही. बावीस कोटी जॉबलेस अशा धगधगत्या सत्यात महागाईचा 'म' सुद्धा मला शिवला नाही. जवळ असलेले प्रेम कधी वाटले नाही , कि कोणाचे हसू पाहवले नाही. तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही. ज्याने हे सर्व दिले, त्याचे रोज आभार सुद्धा साधे मानत नाही . घराच्या माऊलीची छाया असून गर्व कमी होत नाही. एकामागून एक शिडी पार करताना मन कुठे धावत होते हेच उमगले नाही. स्वतः बरोबर,मुलाचा साधा आवडता छंद ...
!!!! Welcome to PHP World !!!!