शाळेने पत्रक काढलं ,' यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला
आर्थिक मदत द्यायची आहे , तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा
निवडावा , ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला / विद्यार्थिनीला मिळेल
!
आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे , खरोखर पंचाईतच होती . ही छोटी
मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की , अगदी एक विजार , एक सदरा असेल ,
तरी तो रोज धुऊन - वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो
घालतात . गरीब मुलगा शोधायचा कसा ? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं ,
तुमच्यात कोण गरीब ; तेही सर्वात गरीब म्हणून ?! मोठीच अडचण होती . तीन -
चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले . वयाने मोठ्या माणसांमधे गरीब
माणूस शोधणं सोप्पं आहे ; पण लहान मुलांमधे अडचणीचं . शेवटी दोन - चार
मुलांना हाताशी घेतलं , जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची .
मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची .
अशा मुलांना विचारलं ," मला एक मदत कराल का ? आपल्या वर्गातला सर्वात
गरीब .......?" क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले ," सर
आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं , तो सर्वात गरीब आहे ."
मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता . " कशावरून म्हणता ?" " सर .
त्याचा सदरा दोन - तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय . त्याने शिवलाय ; पण फ़ाटलेला
शर्ट घालतो . त्याची खाकी पॅंट तर नीट बघा , मागून दोन ठिगळं लावलेली
आहेत . चपला त्याला नाहीतच . मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो . तो मात्र
प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो . सर , ती भाकरीही कालचीच असते
. भाजी कुठली सर ? गुळाचा खडा असतो . आम्ही सांगतो , तो सर्वात गरीब आहे
. शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी ." मुलं एखाद्या खळाळत्या
प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली . पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते . मयूर
एवढा गरीब असेल ? की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत ?
कारण , मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता . अक्षर स्वच्छ , मोकळं
होतं . त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे . एकदा तर त्याची
वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं ," पाहिलंस ! हे
सातवीतल्या मुलाचे अक्षर . असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते .
उत्तराल सुबक परीच्छेद , समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून
लिहिलेली उत्तरे ........." चे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत यॆई .
माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे
. असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये
, या गोष्टीचीच मला खंत वाटली . जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना
उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो ...... अरेरे !..., मी खूप कमी पडतोय
. मयूर , गेल्या सहलीला आला नव्हता . अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती ; पण
त्याचं नाव यादीत नव्हतं . आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही .
असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती
. केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Park बघण्याचे राहून गेले
. एका छान अनुभवाला मुकला होता तो . हा आनंद मी हिरावला होता . यादीत
मयूरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही ? मयूर स्वत : हून
सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच
शिल्लक नव्हता !
शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो . खरंच आहे , मुलांनी सुचवलेलं
नाव . आर्थिक मदत , तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी . आता शंकाच
नव्हती . त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते .
मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड
घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन टाकले .' मयूर जाधव , सातवी अ ,
अनुक्रमांक बेचाळीस ' डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक
म्हणाले , " खात्री केलीये ना सर ? कारण थोडीथोडकी रक्कम नाही . या
विद्यार्थ्याची वर्षाची फ़ी , त्याचे शालेय शिक्षण साहित्य , गणवेश ...
इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे ." मुख्याध्यापकांना मोठया
आत्मविश्वासाने मी म्हटलं , " सर , त्याची काळजीच करू नका . वर्गातला
सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर - मयूर जाधवच आहे !" एका योग्य
विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो . मयूरला मिळणारी
मदत , त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष
याची कल्पनाचित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही . दुस ~ या
दिवशी शाळेत लवकरच गेलो . देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने
फ़ळा सजवला होता . त्यावर ' गरीब असूनही आदर्श ' असं म्हणून मयूरचं नाव
होतं . शाळा भरली . मी अध्यापक खोलीत ...

Comments
Post a Comment